याच्यामागे काय तर्क असेल?
आपल्याकडे मोटारसायकल किंवा कार किंवा इतर प्रकारची गाडी असेल तर गाडीसोबत दोन ओरिजीनल चाब्या मिळतात. या दोन्ही चाब्या सांभाळून ठेवणे गजेचे आहे, कारण त्याशिवाय, तुमचे इन्शुरन्सचे पैसे अडकू शकतात.
याच्यामागे काय तर्क असेल?
इन्शुरन्स कंपनीच्या म्हणण्यानुसार विमा कंपनीला विम्याचे पैसे दिल्यावर कंपनीला वाहनाची मालकी मिळते. जर चोरी झालेली गाडी भविष्यात सापडली तर विमा कंपनी त्या गाडीला विशिष्ट अशा कागदी प्रक्रियेनंतर कोर्टाद्वारे त्यांच्या ताब्यात घेते आणि नंतर दुसर्याला विक्री करते. अशा वेळेस, विमा कंपनी ज्या व्यक्तीला गाडी विकते त्यावेळेस गाडीच्या दोन्ही ओरिजनल चाब्या वाहनधारकास दिल्या देते. म्हणूनच विम्याचा क्लेम करतेवेळी ओरिजनल चाब्या कंपनी जमा करण्याचा आग्रह करते.
म्हणजे फक्त ओरिजीनल चाब्याच सांभाळायच्या असतात, असे मात्र नाही. ओरिजनल चाव्यांव्यतिरिक्त, इन्शुरन्सची ओरिजनल पॉलिसी, रजिस्ट्रेशन कार्डची ओरिजनल पॉलिसी आदी क्लेमच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
कागदपत्रांसहित गाडी चोरीला गेली तर
तसेच आपण बरेच जण गाडीची सर्व कागदपत्र ट्रॅफिक पोलीसांना दाखविण्यासाठी गाडीच्या डिक्कीतच ठेवतो. म्हणून गाडी चोरीला गेली तर कागदपत्रांसहित जाते. अशावेळी या प्रकरणात केवळ पोलिस रिपोर्टच्या आधारे क्लेम दिला जातो. त्यामुळे रिपोर्टमध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
गाडीच्या ओरिजीनल चाब्या हरवल्यातर गाडीधारकाने तात्काळ पोलिसांच्या अहवालात ती माहिती आवर्जून द्यावी. पोलिसांच्या तक्रारीवर आधारित, कंपनी विमा रक्कम भरते. अशावेळी काही केसेस मध्ये किंवा काही राज्यांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये क्लेमच्या बाबतीत बराच वेळ जातो आणि विमा घेणार्या व्यक्तीला नाहक त्रास सहन करावा लागतो, म्हणून ओरिजनल चाब्या सांभाळूनच ठेवाव्यात.


good
उत्तर द्याहटवा